
सावंतवाडी : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पदविका अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकानुसार २० मे ते १६ जून या कालावधीत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यासाठी शासनाने जिल्हानिहाय प्रवेश सुविधा केंद्र सुरु केली असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे एफसी-३४७० या क्रमांकाचे केंद्र उपलब्ध आहे.
याठिकाणी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची छाननी, तक्रार निवारण, कॅप राऊंड पर्याय निवडणे व समुपदेशन इत्यादी गोष्टी निःशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. राज्यात दहावी, बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक प्रवेश अभियांत्रिकीला होतात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रथम वर्षासाठी आणि बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी थेट द्वितीय वर्षासाठी पात्र आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9404272566 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.