गोट्या सावंत ह्यांचा वाढदिवस उत्साहात होणार साजरा

वाढदिवसानिमित्त राबवले जाणार विविध सामाजिक उपक्रम
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 23, 2023 12:38 PM
views 349  views

कणकवली : माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा ३ एप्रिल रोजी ४९वा वाढदिवस साजरा होत आहे. त्याचे औचित्य साधून २८ आणि २९ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त मोफत पंढरपूरवारी, सालाबादप्रमाणे १५१ गरीब वृध्दांना मोफत ज्योतिबा, नरसोबाची वाडी, महालक्ष्मी, पंढरपूरवारी दिनांक १, २, ३ एप्रिल, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा (अंडरआर्म नाईट बॉक्स) यांचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रिकेट स्पर्धेमधील प्रथम क्रमांक १२०००/- व ५ फुटी चषक, द्वितीय क्रमांक - ८०००/- व ४ फुटी चषक, तृतीय क्रमांक- ५०००/- व ३ फुटी चषक, चतुर्थ क्रमांक ३०००/- व २ फुटी चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फलंदाज, गोलंदाज, शिस्तबद्ध संघ अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.०० वा रक्त दान शिबिर, दुपारी २.०० वा. पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक ओव्हन, द्वितीय क्रमांक- मिक्सर, तृतीय क्रमांक- कूकर, ४ ते १० क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू ठेण्यात आले आहेत. दुपारी ४.०० वा. होम मिनिस्टर स्पर्धा, यातील प्रथम क्रमांक- फ्रिज, द्वितीय क्रमांक- वॉशिंग मशिन, तृतीय क्रमांक- गॅस शेगडी, ४ ते १० क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू आणि सर्व उपस्थितांना मोफत लकी ड्रॉ . यात प्रथम क्रमांक LED TV, द्वितीय क्रमांक कुलर, तृतीय क्रमांक- मिक्सर, चतुर्थ क्रमांक- कुकर ५ ते १० क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

३ एप्रिल, २०२३ सकाळी १०.००, संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस व शुभेच्छा कार्यक्रम. सकाळी ११.००, भिरवंडे वृध्दाश्रम येथे फळे व खाऊ वाटप, सकाळी १२.००, करंजे मतिमंद विद्यालय येथे खाऊ व पोषण आहार साहित्य वाटप, दुपारी ३.०० सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षा STS 2023 ONLINE रिझल्ट जाहीर, क्रिकेट स्पर्धा अंतिम सामना हिंदी मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आकारण्यात आले आहे. तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी जि. प. अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे. अधिक माहतीसाठी प्रफुल काणेकर, संजय उर्फ बाबू सावंत, विजय भोगटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.