कुडाळ तालुक्यात अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 29, 2023 19:19 PM
views 111  views

कुडाळ : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष यावेळी करीत शुक्रवारी सायंकाळी कुडाळ तालुक्यातील अकरा दिवसांच्या श्री गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत बाप्पाचा जयघोष करीत श्री गणेश मुर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

गेले अकरा दिवस घरोघरी पूजन करण्यात आलेल्या श्री गणेश मुर्तींचे शुक्रवारी सायंकाळी नदी, तलाव, ओहळ आदी ठिकाणी भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी प्रारंभी आरती करण्यात आली त्यानंतर श्रींना निरोप देण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. सायंकाळ पासून रात्री उशिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत ठिकठिकाणी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.