
कणकवली : कणकवली वासियांसाठी शहरातील सीएनजी पंप सुरू झाला आहे. शहरातील बस स्टँड च्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर आज सीएनजी पंपाचा आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे एरिया मॅनेजर अरविंद सिंग यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सीएनजी चाचणी यशस्वी पार पडली होती. आज पासून सुरू झालेल्या सीएनजी पंपामुळे कणकवली शहरवासींना आता वीस ते पंचवीस किलोमीटर दूर जावे लागणार नाही. हा सीएनजी पंप सुरू झाल्यामुळे सीएनजीधारकांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी राहुल कलापे ,आकाश शिंदे, पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक राजू पाटकर, रवि वारंग, निलेश रावराणे व पेट्रोल पंप कर्मचारी उपस्थित होते. सुरू झाल्यानंतर लगेचच रिक्षा व्यवसायिकांनी सीएनजी व कारचालकांनी सीएनजी भरण्यासाठी रांग लागलेली होती.










