मराठा बांधवांसाठी खुशखबर

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींसाठी सहा महिन्याचा कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्से मोफत
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 25, 2023 11:54 AM
views 378  views

कणकवली : कणकवली च्या "मधुरा कॉम्प्युटर सेंटर" मध्ये . मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींसाठी  सहा महिने कालावधीचा  कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्से मोफत

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी ), पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) यांच्या संयोगाने  "सीएसएमएस- डीईईपी" चे मिळणारं मोफत प्रशिक्षण; विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन...

 मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींना "सीएसएमएस-डीईईपी" हा अभ्यासक्रम मोफत शिकविला जाणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी ''सारथी' व 'एमकेसीएल' यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. . कोर्से मध्ये सध्याच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या कोर्सेस चा समावेश.  

या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली असून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मधुरा कॉम्प्युटर सेंटर च्या संचालिका  रश्मी रविन्द्र बाईत यांच्या वतीने करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४५ इतके असले पाहिजे. तसेच संबंधित विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे. तर या प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहिवासी दाखला आवश्यक आहे. सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम असून, १० हजार युवक- युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण एमकेसीएल चे अधिकृत केंद्र मधुरा कॉम्प्युटर सेंटर (शिवाजी नगर, कणकवली ) मार्फत  दिले जाईल. ऑनलाइन नोंदणी झालेल्या उमेदवारांची छाननी होऊन ती संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे संपर्क -  संचालिका - रश्मी रविन्द्र बाईत (9421266745, 7058170940)