
सावंतवाडी : राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या सौजन्यानं कोकणचा अभिमान गणेशोत्सव सणानिमित्त आपल्या गावी जाण्यासाठी अल्प दरात लक्झरी बस सेवेचे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग युवा गृप, पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून दिनांक 16, 17 व 18 सप्टेंबर 2023 रोजी खास गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या समस्त सिंधुदुर्गवासीयांना अल्प दरात लक्झरी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तिकीट दर रु. 750/- प्रती प्रवासी असून गाडीचा मार्ग- पिंपरी चिंचवड - नवले पूल, पुणे-कोल्हापूर-गगनबावडा- कुडाळ - सावंतवाडी- वेंगुर्ला / दोडामार्ग असा असणार आहे. तुळजाभवानी मंदिर शेजारी, लांडेवाडी चौक, भोसरी, पुणे या ठिकाणाहून संध्या. 6.00 वा. बस सुटणार आहे. अधिक माहितीसाठी शनिवार, 16 सप्टेंबर 2023 समीर दळवी-8796970492 महादेव बागवे - 8087466910, रविवार 17 सप्टेंबर 2023 गजानन परब - 7775099898 अमित वारंग- 9763853506, सोमवार 18 सप्टेंबर 2023 सागर गावडे- 9823635940 गणेश नाईक -7066008821 यांच्याशी संपर्क साधावा. तर जास्तीत जास्त सिंधुदुर्गवासियांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आल आहे.