
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभाग मार्फत परसबाग लागवडीसाठी अगदी माफक म्हणजेच 50 रुपयात 450 ग्रॅम विविध 11 प्रकारच्या भाजीपाल्याचे मिनी किट बियाणे शेतकऱ्याला उपलब्ध करण्यात आलेले आहे. याची मूळ किंमत 200 रुपये असले तरी त्याला 75 टक्के अनुदान हे जिल्हा परिषद शेष निधीतून दिल्यामुळे हे शेतकऱ्याला 50 रुपये मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामध्ये भेंडी, दोडकी, मुळा, गाजर, टोमॅटो, मेथी, मिरची, कारले, फ्लॉवर अशी विविध भाजीपाला बियाणे कणकवली पंचायत समिती कृषी विभाग येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यासाठी शेतकऱ्याने आपला सातबारा व एक अर्ज कृषी अधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर हे भाजीपाला मिनी किट शेतकऱ्याला त्वरित देण्यात येत आहे.