
सावंतवाडी : शहरातील सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या दत्तराम शिरोडकर (वय 63) उभाबाजार यांचे बुधवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे रुग्णालयामध्ये निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजू शिरोडकर यांचे ते बंधू आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व तीन बहिणी असा परिवार आहे. आज सायंकाळी उपरलकर स्मशान भूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श










