शालेय पॉवर लिफ्टिंगमध्ये हेमांगी मेस्त्रीला सुवर्णपदक

Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2025 18:33 PM
views 153  views

सावंतवाडी : अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय १७ वर्षांखालील शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात २९५ किलो वजन उचलत प्रथम क्रमांक घेत सुवर्ण पदक पटकाविले. हेमांगी मेस्त्री हिची आता राष्ट्रीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

चराठा गावची कन्या असलेली हेमांगी मेस्त्री ही माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत आहे. तिने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तिचे वडील होमगार्ड मध्ये पलटण नायक आहेत. तिच्या या यशात कुटुंबियाचीही महत्त्वाची साथ आहे. तिचे कोच मंगेश घोगळे, देवगड पावर लिफ्टिंग असोसिएशन, पोलीस उपनिरीक्षक संजय साटम, गणेश वांगणकर, डॉ शशांक साटम मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिचे शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार सचिव सीए लक्ष्मण नाईक, श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.