
देवगड : पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत श्री. मो. गोगटे. माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेने राज्यात प्रथम पटकावला आहे.36 जिल्ह्यातील 88 स्पर्धकातून प्रशालेची झाली निवड झाली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक डॉ.श्री. राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन शैक्षणिक वर्ष 2024- 2025 मध्ये करण्यात आले होते. विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी व नवीन संधी ओळखण्यासाठी स्पर्धक एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतात व नवनिर्मितीचे सादरीकरण करतात.हॅकेथॉनने मानवी कौशल्य (6 C) या 15 विषयांचा समावेश करून त्यावर आधारित राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन दि. 12 मार्च 2025.पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे करण्यात आले होते.
यात श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेच्या कु. सार्थक सतीशकुमार कर्ले व अथर्व वीरेंद्र फाटक यांनी तयार केलेल्या मासे विक्रेत्यांसाठी ट्रॉली या प्रतिकृतीचा राज्यात शासकीय अनुदानित शाळा गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. याला विज्ञान शिक्षक श्री सतीशकुमार वसंत कर्ले यांचे मार्गदर्शन लाभले. या ट्राली चा उपयोग करून रस्त्यावर मासे विक्रेती करणारे विक्रेते आरामात बसून या ट्रॉलीचा उपयोग करून मासे विकू शकतात. मासे हायजेनिक राहण्यासाठी या ट्रॉलीमध्ये एक पेटी बसवण्यात आले आहे त्या पेटीत बर्फात मासे ठेवता येतात आणि हवेत्यावेळी मासे विकता येतात. मासे विकताना मास्यांवर माशा बसतात म्हणून त्यावर स्टील ची जाळी बसवण्यात आली आहे. त्यामुळे मासे खराब होत नाहीत. ही ट्रॉली स्कुटर ला बांधून ही बाजारापर्यंत नेऊ शकतो. ट्रॉली ला एक छत्री जोडण्यात आली आहे. तिचा वापर करून उनात बसून मासे विकता येतात तसेच त्या छत्रीवर सोलार पॅनल बसवलं आहे ज्यामुळे सौर ऊर्जेचं रूपांतर विदयुत ऊर्जेत करता येते.
ही ट्रॉली बनवताना विशेष मार्गदर्शन. सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातील सदस्य श्री. कारेकर सर, श्री. लाडगावकर सर, श्री. विलास राठोड सर, श्री. योगानंद सामंत सर. यांचं लाभले. कु. सार्थक व अथर्व यांना पुष्प गुच्छ देऊन संस्था अध्यक्ष मा. आमदार अजितराव गोगटे साहेब, शाळासमिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर, सचिव प्रवीण जोग, मुख्याध्यापक सुनिल जाधव यांनी अभिनंदन केले