गोयंकार जतींन तारी दोडामार्ग आयडॉलचा मानकरी | नगराध्यक्ष चव्हाण व मंडळाचे अध्यक्ष पार्सेकर यांच्या हस्ते झाला सन्मान

वक्रतुंड मित्रमंडळ बाजारपेठ दोडामार्ग आयोजित भव्य दिव्य गायन स्पर्धा
Edited by: संदीप देसाई | विनायक गांवस
Published on: November 13, 2022 10:10 AM
views 220  views

दोडामार्ग: वक्रतुंड मित्रमंडळ बाजारपेठ दोडामार्ग आयोजित भव्य दिव्य गायन स्पर्धेत अव्वल येत गोवा येथिल जतिन चारीने दोडामार्ग आयडॉलचा किताब पटकाविला.

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर यांच्या व मान्यवरांच्या  हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन चारिला गौरविण्यात आले.

 दोडामार्ग आयडॉल स्पर्धेचे क्रमांक निहाय मानकरी पुढीलप्रमाणे -प्रथम क्रमांक जतिन चारी, द्वितीय अनुष्का थाली, तृतीय ओंकार शिरवईकर यांनी तर उत्तेजनार्थ प्रथम - शुभम नाईक, द्वितीय - शिवम गोसावी तृतीय - हर्षद मेस्त्री यांनी तर स्थानिक उत्तेजनार्थ उदय हेरेकर यांनी प्राप्त केला.तब्बल ८ तास हा सोहळा चालला. गायक गणेश मेस्त्री, गायिका तृप्ती दामले-कुडाळकर यांनी आपल्या सुमधुर संगीतान रसिकांची मन जिंकली. परिक्षक म्हणून राज मडगावकर, तृप्ती दामले-कुडाळकर, नंदकुमार चांदेलकर यांनी काम पाहील.


नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, गायिका तृप्ती दामले-कुडाळकर, प्रकाश सावंत व विशाल मणेरीकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले ‌