
चिपळूण : येथील गोडबोले'ज क्लासेस च्या, माध्यमिक शालान्त परिक्षा सन २०२४-२०२५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, रविवार, ता.१८ मे रोजी, वीरेश्वर कॉलनीतील, ब्राह्मण सहायक संघ सभागृह मध्ये पार पडला.
गोडबोले'ज क्लासेस ने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सन २०२४-२५ माध्यमिक शाळा इयत्ता दहावी च्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत, ७९ विद्यार्थी डिस्टिंक्शन, ४२ विद्यार्थी फर्स्ट क्लास आणि २२ विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व गुणवंतांंचा, कौतुक आणि सत्कार समारंभ गोडबोले'ज क्लासेस कडून याही वर्षी विशेष अतिथींच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात गुणवंतांंचे कौतुक करण्यासाठी प्रामुख्याने, चिपळूण नगर परिषदेेेचे माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती आणि सध्याचे भाजपा शहराध्यक्ष शशिकांत मोदी, गोडबोले'ज क्लासेस ची माजी विद्यार्थीनी चार्टंड अकौंन्टंट (C.A.) कु. ईशा चितळे आणि डि.बी.जे. महाविद्यालयाच्या अकरावी/ बारावी सायन्स स्पेशल बॅच च्या कोऑर्डिनेटर प्रा. डॉ. सौ.नीलम शिंदे उपस्थित होते. या सोहळ्यात गोडबोले'ज क्लासेस च्या सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्माचचिन्ह आणि बक्षिस देऊन कौतुक करण्यात आले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना मोबाइल हा विद्यार्थ्यांचा शत्रू आहे. आपण जेवढे मोबाईल पासून लांब राहू तेवढी आपली प्रगती चांगली होईल. तसेच पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य ते क्षेत्र निवडण्यास मदत करावी हे सुचवले. तसेच श्री मोदी यांनी गोडबोले सर व त्यांच्या संपूर्ण टीम चे कौतुक करत भविष्यात आपल्याला इंदिरा गांधी सभागृह विद्यार्थ्यांचा सत्कार साठी घ्यावा लागेल असे कौतुक देखील केले.
चार्टंड अकौंन्टंट (C.A.) ईशा चितळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत आपण देखील गोडबोले क्लासेस ची विद्यार्थीनी आहे आणि 10 वर्ष पूर्वी मी सत्कार स्वीकारायला आले होते व आता सत्कार करायला आहे, असे म्हणत गोडबोले'ज क्लासेस चा गौरव केला. ईशा चितळे पुढे म्हणाल्या, NETFLIX, INTAGRAM, FACEBOOK, WHATSAPP व अजून काही SOCIAL MEDIA मध्ये विद्यार्थ्यांनी अडकून ना राहता, आपला ध्येय निश्चित करून त्याकडे लक्ष द्या. त्या पुढे म्हणाल्या की, आपण 12 वी नंतर स्वतःला खूप CONTROL केले आणि म्हणून C.A. होता आले. आपल्यासाठी गोडबोले सर हे MENTOR, FRIEND, GUIDE आणि माझे सर्वांत लाडके गुरु आहेत. मला अजून देखील काही अडचण आली तरी मी त्यांना फोने करते व ते मला योग्य ते मार्गदर्शन करतात.
डि.बी.जे. महाविद्यालयाच्या अकरावी/ बारावी सायन्स स्पेशल बॅच च्या कोऑर्डिनेटर प्रा. डॉ. सौ. नीलम शिंदे यांनी, मार्गदर्शन करताना MOBILE मुळे होणारे दुष्परिणाम सांगितले. या वर्षी 11 वी ची प्रवेश प्रक्रिया ONLINE स्वरूपाची असेल व या प्रक्रियेला आपण कसे सामोरे जाऊ शकतो याचे उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच EDUCATIONAL LOAN संधर्भात देखील त्यांनी माहिती दिली. आपला जर निश्चय असेल तर आपली आर्थिक परिस्तिथी आपल्याला थांबवू शकत नाही, हे त्यांनी काही उदाहरणे देऊन समजावले.
आपले काही गुण हे महाविद्यालयामध्ये मजा मस्ती करण्यामध्ये जातात, तर या गोष्टीकडे पालक व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन पुढची अडीज वर्ष खूप मेहनत केली पाहिजे, मग करियर उत्तम असेल, असा सल्लाही दिला. गोडबोले'ज क्लासेस शिक्षक सहकारी श्री.कापडीसर, अलमिरा मॅडम, तेजल मॅडम व श्री.गांधीसर यांचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.