दोडामार्ग मध्ये शेळ्या दगावण्याच सत्र सुरूच | चांदा ते बांदा योजनेचा लाभ ठरला मारक

Edited by:
Published on: April 06, 2024 14:53 PM
views 147  views

दोडामार्ग : चांदा ते बांदा योजनेचा लाभ दोडामार्ग मधील शेतकऱ्यांसाठी अतिशय मारक ठरला आहे. सासोली येथील अरुण ठाकुर व गणपत धाऊसकर यांचे शेकडो शेळ्यानी भरलेलं शेळ्यांचे गोठे  रिकामी होण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ शेळीपालकांवर येऊन ठेपली आहे. शासनाने ही योजना देऊन आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली अशा वेदनादायी प्रतिक्रिया या आपतग्रस्त शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

सासोली येथील या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेळ्या दगावत असून कित्येक शेळ्या रोगाने ग्रासल्या आहेत. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत या शेळी पालकांना शासनाने पुरविलेल्या शेळ्यांच्या गटात काही शेळ्या या रोगग्रस्त असल्याने त्यांची बाधा. स्थानिक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील शेळ्यांनाही झाली परिणामी योजनेअंतर्गत पुरवलेल्या शेळ्या तर मरण पावल्या मात्र त्यांचा रोग शेतकऱ्यांच्या गोठ्यातील हेल्दी शेळ्यांना बादल्याने शासनाने शेतकऱ्यांना पुरविलेल्या शेळ्या माघारी नेल्यानंतरही लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यातील शेळ्या मरतच आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून हा मृत्यूचा तांडव शेळी पालक शेतकरी अनुभवत आहेत. रोगग्रस्त शेळ्यांवर औषध उपचार करूनही आणि त्यासाठी हजारो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांच्या शेळ्या दगावतच आहेत. त्यामुळे चांदा ते बांदा ही योजना आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी प्रचंड प्रमाणात मारक कारल्याची भावना शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे. सासोली येथील शेतकरी अरुण ठाकूर यांच्या गोठ्यातील वीसहून अधिक स्थानिक शेळ्या मरण पावल्या आहेत. त्यात शनिवारी ही अजून शेळ्या दगावल्या आहेत. तर दहा ते बारा अन्य शेळ्यांना रोगाची लागण झाल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे.  सातत्याने औषध उपचार करून,  वाफ देउन, पंधराशे रुपयांची इंजेक्शन देऊनही शेळ्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नाही. शेळ्या दगावतच आहेत.  हीच परिस्थिती गणपत धाऊसकर यांची आहे. शासनाने योजनेच्या नावाखाली ठेकेदारांवर योग्य तो अंकुश न ठेवल्याने विकतच दुखणं आपल्या पदरी घातल्याच्या संतप्त भावना धाऊसकर यांनी व्यक्त केल्यात. आता ही परिस्थिती बघून व दिवसागणिक मरणाऱ्या शेळ्या पाहून त्याने होणारे नुकसान असह्य करणारे आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास आमच्यावर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी संतप्त भावना शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे.  

धुरी शेतकऱ्यांच्या पाठीशी...

दरम्यान शेतकऱ्यांच्या गोठ्यात प्रत्यक्ष भेट देत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पाहणी केली आहे. शासनाने या आपतग्रस्त शेळी पालकला प्रत्यक्ष शेळीमागे साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई देऊन त्यांची भरपाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांना शासनाने योजनेचा लाभ दिला आणि त्यामुळे त्यांचे नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांचे सर्व गोठे दत्तक घेत शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्याची मागणीही धुरी यांनी केली आहे.