गोवा बनावटीची दारू पकडली

वैभववाडी पोलीसांची कारवाई
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 03, 2024 19:37 PM
views 464  views

वैभववाडी : गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार वैभववाडी पोलीसांनी भुईबावडा चेकपोस्ट पकडली. कारसह १० लाख ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीसांनी चालक महेश सुनील बाबर (वय ३०)राजेंद्र जोतीराम गो-हे वय ३० दोघेही राहणार खानापुर विटा सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला.ही कारवाई शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता भुईबावडा येथे केली.

गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या कार संदर्भात वैभववाडी पोलीसांना गुप्त माहिती मिळाली होती.त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल,हरिश जायभाय, उद्धव साबळे, लक्ष्मीप्रसाद हाके,अजय बिल्पे या पोलीसांनी सापळा रचला होता.रात्री पावणे अकराच्या सुमारास भुईबावडाहुन गगनबावड्याच्या दिशेने जाणारी एम एच १०ईई २१२१ही कार भुईबावडा तपासणी नाक्यावर आली.गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटीच्या ४०हजार ८००रुपये किंमतीचे दारुचे १६बॉक्स सापडले.पोलीसांनी गाडीसह मुद्देमाल जप्त केला.