
बांदा : शहरात गोमंत साई सेवक व साईमंदीर सांगोर्डा गोवा आयोजित गोवा ते क्षेत्र शिर्डी पदयात्रेचे बांदा येथील साईमठ व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ही पदयात्रा गुरूवार दि. ५ जानेवारी २०२३ पासून सुरू झाली असूनही २० जानेवारी २०२३ रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचणार आहे. या पदयात्रेत १५० साईभक्त सहभागी झाले आहेत. या पदयात्रेचे बांद्यात आगमन होताच श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रवींद्र मालवणकर, ज्ञानेश्वर केसरकर, दत्तप्रसाद केसरकर, शैलेश केसरकर, साईराज साळगावकर, बंड्या हरमलकर, सुधा सांळगावकर, गिरीष महाजन, किशोर सांळगावकर, विजय कासार, दर्शना केसरकर, राजश्री तेंडले, सुशील मोरजकर, बांदा ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, सतीश नाटेकर, मंगलदास साळगावकर आदी भक्तगण उपस्थित होते.यावेळी साईच्या पादुकांचे पूजन व साईची आरती करण्यात आली. सर्वाच्या सुख, समृध्दी, व चांगल्या आरोग्यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.