गोव्याचे CM डॉ. प्रमोद सावंत 30 नोव्हेंबरला सिंधुदुर्गात !

Edited by: विनायक गावस
Published on: November 29, 2023 11:05 AM
views 274  views

सावंतवाडी :  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उद्या ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात देव दर्शनासाठी येणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावात डॉ. प्रमोद सावंत यांचे कुलदैवत आहे. कुलदैवत श्री भवानी माता व श्री देवी भावई तसेच पुण्यभूमी माणगाव दत्त मंदिर येथे ते देवदर्शन घेणार आहेत. सावंत-भोसले परिवाराकडून त्यांचं कुणकेरीत जंगी स्वागत केलं जाणार आहे.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत भोसले ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कुलदैवत श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी कुणकेरी येथे येणार आहेत. समस्त सावंत-भोसले कुटुंबीयांचे कुलदैवत कुणकेरी येथे आहे. यादरम्यान श्री देवी भावई कुणकेरी मंदिरामध्ये दर्शन घेतील.

कुणकेरी भवानीवाडी येथील भवानी मंदिरमध्ये ते येणार आहेत. डॉ प्रमोद सावंत यांचे कुलदैवत असल्याने ते किंवा त्यांचे कुटुंबीय या पुर्वी दर्शन, उत्सवाच्या निमित्ताने येथे आलेले आहेत. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत भोसले हे कुणकेरी येथे येणार आहेत त्यामुळे सावंत भोसले परिवाराने त्यांचं जंगी स्वागत करण्याचे नियोजन केलं आहे.