
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अखेर सुरू झाली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात ओबीसी नेते तथामंत्री छगन जी भुजबळ साहेब यांनी ओबीसी, व्हीजीएनटी व एस बी विद्यार्थ्यांना एसी व एसटीच्या धर्तीवर शिकणाऱ्या मुला मुलींना शासकीय वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. त्यांच्यासाठी बाहेरगावी शिकणाऱ्या मुला मुलींसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करून वर्षाकाठी 60 हजार रुपये देण्याची मागणी केली होती.
त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडवणीस साहेब यांनी राज्यातील 21000 मुला-मुलींना या योजनेअंतर्गत लाभ दरवर्षी देण्यात येईल अशी विधानसभेत घोषणा केली होती पण तू शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे या योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. माननीय छगन भुजबळ साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे याबाबतचा शासन निर्णय निघाला होता. परंतु परंतु अजून पर्यंत शासकीय वसतिगृह सुरू झाली नसल्यामुळे वर्षाकाठी साठ हजार रुपये विद्यार्थ्यांना देणारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
11 मार्च 2024 ला शासन निर्णय काढून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करत असल्याबाबत व त्याबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीनंतर उच्च शिक्षण, पदवी, अभियांत्रिकी व इतर सर्व शाखा डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक ७ जून २४ च्या पत्रानुसार ठरवून दिले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत किमान 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत. शिष्यवृत्तीसाठी आवश्यक उत्पन्न मर्यादा यासाठी लागू राहील. तसेच विद्यार्थ्यांनी शासनमान्य प्राप्त महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी 75 टक्के हजेरी अनिवार्य आहे. तरी जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी बाहेरगावी शिक्षण घेत आहेत ज्यांनी वसतिगृहाचा लाभ घेतला नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ७ जुलै 24 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. तरी सर्व ओबीसी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ओबीसी नेते तसेच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी केले आहे.