ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे पुरस्कार जाहीर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 03, 2026 18:16 PM
views 483  views

सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन २०२६ चे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचे हे २० वे वर्ष असून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी हे पुरस्कार जाहीर केलेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली २० वर्ष विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारिता, कला, संगीत, क्रीडा, कृषी, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव संस्थेकडून केला जातो. आज निवड समितीने जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे पुरस्कार जाहीर केलेत. जिल्ह्यातून आलेल्या विविध प्रस्तावांची छाननी करण्यात आली. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी सुरेश जानू काळे (ता. दोडामार्ग ), शैक्षणिक कार्यासाठी सायली सिताराम लांबर (ता. कुडाळ), शैक्षणिक कार्यासाठी आनंदी रघुनाथ घोगळे (ता. मालवण), शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यासाठी संगिता तानाजी सोनटक्के ( ता. सावंतवाडी), पत्रकारिता व सामाजिक कार्यासाठी संजय पिळणकर ( ता. वेंगुर्ला), ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आनंद महादेव देवळी ( ता. सावंतवाडी), सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी निवृत्त मुख्याध्यापक विलास अर्जून कासकर ( ता. दोडामार्ग), शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी दीपक जगन्नाथ राऊळ ( ता.सावंतवाडी) यांना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी निवड समितीचे संस्थापक वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, खजिनदार एस. आर. मांगले, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गांवस, सदस्य संजय बांबूळकर, सुनिल नेवगी, भरत गावडे आदी उपस्थित होते. हे पुरस्कार एस‌. आर. मांगले, सौ. रेश्मा भाईडकर, व्ही.टी. देवण यांनी पुरस्कृत केलेले आहेत.