
सावंतवाडी : अंजली दमानिया यांनी केलेले आरोप निराधार आहेत. दीपक लोंढेंशी माझा कोणताही संबंध नाही. लोंढे अशोक खरात यांच्याशी बोलले असतील तर त्याच्याशी माझा संबंध जोडण योग्य नाही. विनाकारण माझं नाव प्रत्येक गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी दिली.
ते म्हणाले, अंजली दमानिया यांनी अशोक खरात यांच्याशी राज्यातील नेत्यांचे फोनवर संभाषण झाल्याचा दावा केला आहे. जोपर्यंत खरात यांच्यावर कोणतेही आरोप नव्हते तोवर त्यांच्याशी बोलण्यासाठी कोणतेही निर्बंध नव्हते. केवळ फोनवर बोलले म्हणून ज्येष्ठ मंत्र्यावर आरोप करणे हे चुकीचे आहे. दीपक लोंढे खरात यांच्याशी कितीदा बोललेत याच्याशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न अंजली दमानिया करत असून माझा दीपक लोंढेंशी कोणताही संबंध नाही. ते अशोक खरातशी बोलले असतील तर त्याच्याशी माझा संबंध नाही. विनाकारण माझं नाव प्रत्येक गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न करणे योग्य नसल्याचे श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले.











