बापर्डे ग्रामपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 18, 2023 12:15 PM
views 134  views

देवगड : बापर्डे गावचे सुपुत्र सुहास राणे यांचे पूतणे व लंडन येथे वास्तव्यास असणारे रवींद्र केशवराव राणे, पत्नी कविता रवींद्र राणे व मुलगी कुमारी जुई रवींद्र राणे यांनी ग्रामपंचायत बापर्डेला नुकतीच भेट दिली. बापर्डे गावाविषयी दूरचित्र वाहिनीवरती व वर्तमानपत्रामध्ये येत असलेल्या बातम्या पाहून रवींद्र राणे आणि परिवार प्रत्यक्ष गावाला भेट देण्यासाठी आले.

लंडन येथे नोकरी व्यवसायानिमित्त असताना सुद्धा त्यांची आपल्या गावाबद्दल व गावाच्या विकासाबाबत आत्मीयता असून गावामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रामपंचायतमध्ये येवून त्यांनी गावामध्ये झालेल्या विकास कामांबाबत व ग्रामपंचायती राबविण्यात येणारे विविध उपक्रमा तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

रविंद्र राणे आणी त्यांचे कुटुंबीय गावामधील स्वच्छता पाहून भारावून गेले व त्यांनी ग्रामपंचायत सफाई कर्मचारी उमेश सावळाराम सकपाळ यांना रोख रक्कम दहा हजार रुपयांचे पारितोषिक देवून गौरव केला.यावेळी सरपंच संजय लाड,ग्रामसेवक सुशील जाधव,ग्रा.प. सदस्य गुणवंत राणे, माजी सरपंच जयराम राणे,ग्रामस्थ बाबुराव राणे व ग्रामपंचायत कर्मचारीआदी उपस्थित होते.