वनपाल प्रकाश पाटील यांच्या कार्याचा गौरव...!

उपवनसंरक्षक कोल्हापूर यांच्याकडून सन्मान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 27, 2024 07:17 AM
views 343  views

वैभववाडी : सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल प्रकाश दिनकर पाटील यांना वृक्षलागवड व संगोपन या कार्याकरिता उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कुर्ली धरणक्षेत्रात केलेल्या वृक्षलागवडीबद्दल श्री.पाटील यांचा सन्मान करण्यात आला.२६जाने रोजी कोल्हापूर येथे हा कार्यक्रम पार पडला.

पाटील हे सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी मध्ये सन २०१७ मध्ये रुजू झाले. सन२०१७ते २०२१ या कालावधीत ते वनरक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांनतर एप्रिल २०२१मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली. त्यांच्यावर तालुक्याच्या वनपाल पदाची जबाबदारी देण्यात आली. गेल्या सात वर्षांच्या सेवा कालावधीत त्यांनी वृक्षलागवड व संवर्धन या कामांवर विशेष लक्ष दिले.

याच कालावधीत त्यांनी कुर्ली धरण क्षेत्रात ३हजार वृक्षांची लागवड केली.या सर्व वृक्षांचे यशस्वीपणे संगोपनही केले.त्यांच्या या कामाची दखल वरिष्ठांकडून घेण्यात आली.त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोल्हापूर विभागाचे उपवनसंरक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रजासताक दिनी कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.