
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांचे रक्ताअभावी हाल होत होते. शस्त्रक्रिया करण आवश्यक असल्यानं वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना रक्तदात्यांसाठी आवाहन केले. यानुसार रविवारी युवा रक्तदाता संघटनेच्या सर्व रक्तगटाच्या रक्तदात्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. यामध्ये आशिष यादव, प्रकाश चौधरी, प्रदीप सावरवाडकर, किसन धोत्रे, रॉक्सन डॉन्टस, अक्षय पंडीत, सुमित कदम आदींनी रक्तदान करत रूग्णांना जीवनदान दिलं. यासाठी रक्त संक्रमण अधिकारी सौ. रेडकर व कर्मचारी वर्ग यांनी अधिक मेहनत घेतली. प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल असलेल्या रूगण्यांना या रक्ताची गरज होती. रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केल्यानं रूग्णांसह नातेवाईकांना दिलासा मिळाला. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी यासाठी अधिक परिश्रम घेतले. वेळेला धावून आल्यानं उपजिल्हा रुग्णालयाकडून रक्तदाते व युवा रक्तदाता संघटनेचे आभार मानण्यात आले.