विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी लागणारे दाखले प्राधान्याने द्या | युवासेनेनं वेधलं दोडामार्ग तहसीलदारांचं लक्ष

Edited by: संदीप देसाई
Published on: June 14, 2023 14:16 PM
views 82  views

दोडामार्ग : शाळा कॉलेज नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेच्या पार्श्वभुमीवर महसूल प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले प्राधान्याने व वेळेत द्यावेत अशी मागणी बुधवारी दोडामार्ग तालुका युवा सेनेने तहसीलदार अरुण खानोलकर यांचेकडे केली आहे. 

याबाबत तालुकाप्रमुख संजय गवस यांच्या उपस्थितीत तहसीलदार खानोलकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी शहरप्रमुख ओंकार कुलकर्णी, समीर म्हावसकर, विष्णू मुंज आदी उपस्थित होते. विद्यार्थ्याना शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक दाखले वेळेत मिळाले नाही तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने त्यांचे दाखले वेळेत द्यावे यासाठी चर्चा केली. यावर तहसीलदार खानोलकर यांनी आता महसूल विभागाची दाखले देण्याची पद्धत बदलली असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नुसार दाखले वितरित होत आहेत.

1 जून पासून त्याची अमंबजावणी सुरू झाली आहे. आणि आपल्याकडून शाळकरी मुलांचे दाखले फास्ट्रेग पद्धतीनं दीले जात आहे. त्यामुळे उशीर होणार नाही याची आम्ही काळजी घेत असल्याचे सांगितले. मात्र सर्व कर्मचारी, अधिकारी व सेतू चालक यांना योग्य सूचना देऊन शाळकरी मुलांची दाखले मिळविण्यासाठी होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी युवा सेनेन केली आहे.