वाशी मार्केटमध्ये सिंधुदुर्गातील आंबा व्यापा-यांना जागा द्या

अतुल रावराणेंची कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभू पाटीलांकडे मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 05, 2025 11:42 AM
views 193  views

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या आंबा व्यापा-यांना याठिकाणी आंबा विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी एपीएमसीचे सभापती प्रभू पाटील यांच्याकडे केली आहे. रावराणे यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन श्री.पाटील यांनी दिले आहे.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी प्रभु पाटील यांची निवड झाली.या निवडीनंतर अतुल रावराणे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या भेटी दरम्यान वाशी मार्केटमध्ये कोकणातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली. कोकणातील हापुस आंबा मोठ्या प्रमाणावर या मार्केटमध्ये येतो.मात्र येथील दलाल, अडत्यांमुळे आंबा उत्पादक नाडला जातो. कोकणातून येणाऱ्या या उत्पादकांना आंबा विक्रीसाठी या मार्केटमध्ये स्टाॅल उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी रावराणे यांनी श्री पाटील यांच्याकडे केली. या मागणीवर सकारात्मक चर्चा झाली.यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन श्री पाटील यांनी दिले.