मराठा समाजाला दाखले द्या | देवगड तहसीलदारांना निवेदन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 20, 2023 20:10 PM
views 177  views

देवगड : तालुक्यातील मराठा समाजासाठी मराठा उल्लेख असलेले दाखले मिळावेत, असे निवेदन देवगड तालुका मराठा समाजातर्फे तालुक्याच्या तहसीलदारांना सादर करण्यात आले.

देवगड तालुक्यातील मराठा समाजातील अनेक युवक उद्योग व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. युवकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या अनेक योजनांतर्गत बँकांमधून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु देवगड तालुक्यातील अनेक मराठा युवकांकडे मराठा समाजाचे दाखले आणि शाळेच्या दाखल्यावर ‘मराठा’ असा उल्लेख नसल्याने त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. मराठा आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र शासनाने अद्याप रद्दबादल केलेला नाही. मराठा समाजाचे दाखले हे ‘सारथी’ संस्थेच्या अनेक उपक्रमांमध्ये तसेच आर्थिक दृषट्या मागास घटक दाखला मिळवणेसाठी लागतात. त्यामुळे हे निवेदन स्वीकारून आमची मागणी पूर्ण करावी, असे तहसिलदार महोदयांना सांगण्यात आले.

यावेळी संदीप साटम, बंटी कदम, किसन सूर्यवंशी, प्रवीण वातकर, संजीव राऊत, दयानंद पाटील, शेखर सावंत, केदार सावंत, सुधीर तांबे, नंदू देसाई, प्रकाश सावंत, सचिन मोहिते, प्रदीप सावंत, विष्णू सावंत, मनोज सावंत, गजेंद्र सावंत, बबन सावंत, पंकज दुखंडे, निलेश सावंत, गोविंद घाडी, राजू भुजबळ आदी मराठा बांधव उपस्थित होते.