गितेश राऊत, शैलेश परब आज दोडामार्ग दौऱ्यावर | कार्यकर्त्यांना होणार छत्री वाटप

Edited by: संदीप देसाई
Published on: July 11, 2023 10:40 AM
views 137  views

दोडामार्ग : सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब यांचा मंगळवारी मतदार संघाचा झंझावती दौरा असून या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख व बूथ प्रमुख, बेसिक, युवा व महिला पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त यांना छत्र्या वाटप कार्यक्रम होणार आहे.

11 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता दोडामार्ग येथील परमेकर सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी युवा नेते गिरीश राऊत, शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आदी उपस्थित राहणार आहे. विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपविभाग प्रमुख, युवासेना, महिला आघाडी तील पदाधिकारी यांसह सर्व विभागातील शाखा व बुथ प्रमुख यांनी उपस्थीत राहावे असे आवाहन तालुका प्रमुख संजय गवस, मदन राणे व श्रेयाली गवस यांनी केले आहे. या दरम्यान शैलेश परब व पदाधिकारी दोडामार्ग मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आगामी वाटचालीसाठी बळ देणार असल्याने येथील कार्यकर्त्यात नवं चैतन्य मिळणार आहे.