नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 04, 2024 11:46 AM
views 115  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन 'बालिका दिन' साजरा करण्यात आला .यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका निलम डांगे आणि पर्यवेक्षक ओंमकार गाडगीळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला.

त्यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक ओंकार गाडगीळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती विशद केली. तसेच प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका निलम डांगे यांनी मुलांना बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊन सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करण्याचे आवहान केले. कार्यक्रमाचे निवेदन सहाय्यक शिक्षिका रोहिणी मर्ये यांनी केले.

बालिका दिनाचे औचित्य साधून 'कळी उमलताना' या नाविन्यपूर्ण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. प्रणाली बाने, डॉ. निलोफर जमादार आरोग्य सेवक रविंद्र नायकोजी, गणेश  तेली उपस्थित होते. शाळेच्या उपमुख्याध्यापिका निलम डांगे यांनी शाल ,श्रीफळ ,फुल देऊन सर्वांचे स्वागत केले.

यावेळी डॉक्टर प्रणाली बाने यांनी किशोरवयीन मुलींना तर आरोग्य सेवक नायकोजी यांनी  मुलांना योग्य मार्गदर्शन केले.  तेव्हा ते असे म्हणाले , वाढत्या वयाबरोबर मुला-मुलींच्या शारीरिक व मानसिक जडणघडणीमध्ये कशाप्रकारे परिवर्तन होते . याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले .यावेळी त्यांनी आपला आहार कसा असावा तसेच आपण आपली शारीरिक काळजी कशी घ्यावी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल माहिती सांगितली. 

शाळेच्या सहशिक्षिका मर्ये आणि शाळेची सहशिक्षक शत्रुघ्न कोरे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.