LIVE UPDATES

युवती बेपत्ता...

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 03, 2025 16:22 PM
views 101  views

देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार साई कॉलनी येथून एक युवती बेपत्ता झाली असल्याबद्दलची फिर्याद रानू पांगरू पांढरे यांनी दिली आहे. तळेबाजार येथील साई कॉलनी येथे वास्तव्यास असणार्र रुपा विलास पांढरे, वय २२ वर्षे ही ३१ मेपासून बेपत्ता असल्याची फिर्याद रानू पांगरू पांढरे (रा. तळेबाजार, साई कॉलनी) यांनी सोमवारी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुपा पांढरे ही ३१ मे रोजी मध्यरात्री १ वा. च्या सुमारास घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेली. तिचा नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महाडिक यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.