कलंबिस्त हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांकडून 'वॉटर प्युरिफायर' भेट

Edited by: विनायक गावस
Published on: July 12, 2023 13:31 PM
views 183  views

सावंतवाडी : शाळा आपले जीवन घडवते. या शाळेच्या ऋणांतून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या शैक्षणिक वर्ष-१९९९-२००० च्या इ.१० वी च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आर्थिक सहयोगातून प्रशालेला शुद्ध व स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने 'वॉटर प्युरिफायर' संच भेट दिला.

या वॉटर प्युरीफायर संचाचे उद्घाटन व प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी या बॅचमधील माजी विद्यार्थी समीर धोंड, रंजना तावडे,रेश्मा राऊळ,न्हानू धुरी, माजी सैनिक कॅप्टन सुभाष सावंत, माजी मुख्याध्यापक सिताराम सुर्वे, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी आदी उपस्थित होते. याप्रसंगी  माजी विद्यार्थीनी रंजना तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी आभार व्यक्त केले.