
चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष विभागासाठी चिपळूण येथील लायन्स क्लब तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थीनींनीसाठी वेंडिंग मशीन भेट देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपणारे लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सी म्हणजे सक्रिय कामाचे प्रतीक आहे. त्यांनी भागात काम करून लोकांना मदतीचा हात दिला आहे. लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सी येशील महिला त्यांनी अधिकारी डॉ. शमिना परकार आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला अधिकारी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थीनींनीसाठी वेंडिंग मशीन भेट दिली. यावेळी सॅनिटरी पॅडचे देखील वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल डीबीजे महिला विकास कक्षतर्फे लायन्स क्लबचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाला महिला विकास कक्ष प्रमुख सौ. प्रा. दिशा दाभोळकर, तसेच, सदस्य प्रा. सौ उज्ज्वला कुलकर्णी, प्रा.तृप्ती यादव, प्रा.सिध्दी साडविलकर, प्रा. मृण्मयी सोहोनी, प्रा.सौ.जाधव ,प्रा सुचिता दामले,प्रा.कांचन तटकरे, यांनी विशेष परिश्रम केले.यावेळी सौ.ऋतुजा लोंढे,प्रा.सोनाली खर्चे, प्रा प्राजक्ता चितळे,प्रा सौ.जगताप,प्रा.टाकळे. आदि उपस्थित होत्या. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव बापट, उपप्राचार्य प्रा.नामदेव तळप, पर्यवेक्षिका प्रा.सौ.स्नेहल कुलकर्णी, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी यांचे मार्गदर्शन लाभले.