नितेश राणे यांच्याकडून देवगड तहसीलला संगणक संच भेट

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 10, 2023 15:31 PM
views 130  views

देवगड : देवगड तहसिल कार्यालयाला दिलेल्या आधुनिक सामुग्रीचा वापर करून प्रशासन आपला कारभार लोकाभिमुख व गतीमान करील, लोकांच्या सुविधेसाठी आपण जागृत असून यापुढेही कोणतीही गरज लागल्यास आपण सहकार्य करू,अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे दिली.

देवगड तहसिल कार्यालयामध्ये स्थानिक विकास निधीतुन आ.नितेश राणे यांनी पाच संगणक व दोन प्रिंटर दिले.यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर तहसिलदार आर.जे.पवार, माजी आमदार अॅड.अजित गोगटे, नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर डॉक्टर अमोल तेली संदीप साटम, प्रकाश राणे दयानंद पाटील, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, सर्व नगरसेवक कार्यक्रमाला सर्व महसुल कर्मचारी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.