घोटगे - सोनवडे घाट रस्त्याचे काम भाजप सरकारच पूर्ण करेल : रविंद्र चव्हाण

भडगाव पुलाच्या लोकार्पण सोहळा झाला संपन्न
Edited by:
Published on: September 04, 2023 21:47 PM
views 93  views

कुडाळ :  घोटगे-सोनवडे घाट रस्त्याचे काम भाजप भाजप सरकार सरकारच पूर्ण करेल असा शब्द भडगाव पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भडगाव ग्रामस्थांना दिला. पणदुर घोटगे रस्ता भडगाव येथे जुन्या पुलाच्या ठिकाणी उंच पातळीचा पुल बांधणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, सुप्रिया वालावलकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ज्येष्ठ पदाधिकारी गुरूनाथ राऊळ, अभियंता अजय सर्वगोड, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, अधिक्षक अभियंता छाया नाईक, आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, अतिशय कमी वेळेत पुलाची उभारणी केल्याने अधिकारी ठेकेदाराचे कौतुक करतो. आता कितीही पाऊस आला तरी पुलावरून पाणी जाणार नाही. वहातुक अडणार नाही. २०१९ मध्ये धोकाबाजीने सरकार आल. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री  करायचे असताना धोकाबाजीने आलेल्या सरकारला इथल्या लोकप्रतिनिधींने पाठींबा दिला. असे सांगून लॉरेन्स मान्येकर सारखा छोटा कार्यकर्ता भाजपमधून पोटनिवडणुकीत जिंकले त्याची परतफेड म्हणून पुलाचे काम केले. जो घाट तुमच्या आमच्या स्वप्नात आहे त्या घाटाची सुरूवात केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी केली. त्यावेळी वन जमीन केंद्रीय मंत्री राणे यानी दिली. या घाटाचा अध्याय त्यानीच केला. आता हा घाट येणाऱ्या काळात भाजप पूर्ण करेल सबका साथ सबका विकास या मूलमंत्रावर आपण काम करत आहोत आम्हाला विकास करायच आहे कोकण महामंडळातून येणाऱ्या काळात विकास केला जाईल. येणाऱ्या काळात विकासाचे नियोजन करण्यात येईल.  संकेश्वर ते रेडी रस्ता चांगल्या सुस्थितीत ठरलेल्या वेळेमध्ये करू. धडपडा कार्यकर्ता म्हणून लॉरेन्स मान्येकर असुन त्यानी दिलेले प्रश्न सोडवू या पंचक्रोशीला ५० लाखापेक्षा नियोजनातून निधी दिला. विकासाची गंगा गतिमानाने पूर्ण करू नियोजन मंडळाचा निधी १०० टक्के खर्च करू भजन मंडळाला चांगली बातमी देऊ. असे सांगून पुढील काळात कमळ फुलवा असे आवाहन केले.

चोरून लोकार्पण करू नका - माजी खासदार निलेश राणे

माजी खा.निलेश राणे म्हणाले, विकासासाठी निधी गायब झाला होता. तो आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर पालकमंत्री चव्हाण करीत आहेत. कालच काही लोकांनी लोकार्पण केले. चोरून लोकार्पण करू नका अशा कानपिचक्या दिल्या आमदार वैभव नाईक यांच नाव घालून प्रोटोकाल पाळला. माझ नाव नाही हा पुढच्या वर्षी येईल पाटीवर. नाव असण्यापेक्षा मन आणि जनपटावर काम असावे असा टोला लगावला. घोटगे-सोनवडे घाट रस्ता पालकमंत्री रविंद्र चव्हाणच पूर्ण करू शकतील या घाट रस्त्याचे काम शिंदे फडणवीस सरकारच करेल असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यानी व्यक्त केला. या भागात घाटाचा ज्वलंत मागणी आहे आणि घाटाचा प्रश्न भाजप सरकार सोडवेल. असा ठाम विश्वास व्यक्त केला. मुंबई -गोवा महामार्गाची उर्वरीत लेन गणपतीपूर्वी चव्हाणच पूरण करतील नऊ. वर्षे आपला मतदार सघ तडफडतोय. पत्रांचा ढीग राहीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी या भागात मोठा निधी दिला. नजर जाते तेथे भाजपात लोक येतात कारण आपले सरकार जनतेसाठी काम करीत आहे. गणपतीसाठी गाड्या सोडल्या. येणाऱ्या काळातील काम भाजप म्हणून आम्हीच पूर्ण करु असे त्यानी  ठामपणे सांगितले. 

आता घोडगे -सोनवडे घाट- राजन तेली 

घाटाचे येथील ग्रामस्थांना वेध लागले आहेत या घाटासाठी सर्व ग्रामस्थ आतुरले आहेत त्यामुळे बजेटमध्ये याची तरतूद करावी अशी मागणी केली. या पुलाला जमिन देणाऱ्याचा सन्मान यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ओरोस मंडल दादा साईल यांनी केले तर आभार पप्यातवटे यानी मानले.