
चिपळूण : खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा ॲग्रो ट्रेनिंग सेंटर मध्ये, शुक्रवारी १८ ऑक्टोबर २०२४ रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. घरडा फाऊंडेशन, घरडा केमिकल्स लिमिटेड आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने, घरडा आयोजित करण्यात आलेल्या या शेतकरी मेळाव्याला , प्रमुख अतिथी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे, घरडा फाऊंडेशन चे विश्वस्त सतीश वेंगोली, घरडा केमिकल्स लिमिटेड लोटे चे लोकेशन हेड आर.सी.कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात शेतकऱ्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे, डॉ. प्रदीप हळदवणेकर, डॉ.पराग हळदणकर आणि घरडा केमिकल्स चे विनायक दळवी मार्गदर्शन करणार आहेत.या.कृषी मेळाव्याचे निमित्ताने घरडा कृषी संसाधन केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कृषी संसाधन केंद्रामार्फत मेळाव्यात कृषी संबंधित शेळीपालन, कोंबडीपालन, अळंबी उत्पादन, गांडूळखत निर्मिती, भाजीपाला शेती उत्पादन, ड्रोनद्वारे फवारणी आदी प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी शेती आवश्यक कृषी प्रदर्शन ही आयोजीत करण्यात आले आहे. हा मेळावा बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल परिसरातील घरडा ॲग्रो ट्रेनिंग सेंटर मध्ये होत असल्याने शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी घरडा फाऊंडेशन चे संदिप फेफडे, तुषार हळदवणेकर, वैभव सनगर मेहनत घेत आहेत.