LIVE UPDATES

ठेकेदारांकडून दर्जेदार कामे करुन घ्या – पालकमंत्री नितेश राणे

विजयदुर्ग दशक्रोशीमध्ये विकासकामे करताना सर्वच विभागाच्या अधिका-यांनी काळजीपुर्वक लक्ष देवून ठेकेदारांकडून कामे करुन घ्या कामामध्ये दिरंगाई व निष्कृष्ट दर्जाचे ठेकेदाराने काम केल्यास त्यांची गय केली जाणार नाही असे सक्त आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी पडेल कँटिंग येथे विजयदुर्ग,पडेल परिसरातील विकास कामांच्या आढावा बैठकीच्या वेळी दिले.
Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 13, 2025 21:17 PM
views 214  views

देवगड : विजयदुर्ग दशक्रोशीमध्ये विकासकामे करताना सर्वच विभागाच्या अधिका-यांनी काळजीपुर्वक लक्ष देवून ठेकेदारांकडून कामे करुन घ्या कामामध्ये दिरंगाई व निष्कृष्ट दर्जाचे ठेकेदाराने काम केल्यास त्यांची गय केली जाणार नाही असे सक्त आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी पडेल कँटिंग येथे विजयदुर्ग,पडेल परिसरातील विकास कामांच्या आढावा बैठकीच्या वेळी दिले.

विजयदुर्ग पडेल परिसरातील विकास कामांबददल विशेषता करुन नळपाणी योजनांच्या समस्येबाबत आढावा बैठकिचे आयोजन साई मंगल कार्यालय पडेल येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावरती माजी आमदार अजित गोगटे, देवगड तहसिलदार आर.जे.पवार, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, पडेल मंडल भाजपा अध्यक्ष महेश ऊर्फ बंडया नारकर, राजा भुजबळ, डॉ.अमोल तेली, आरिफ बगदादी,संजय बोंबडी,पडेल सरपंच भुषण पोकळे, माजी सभापती रवि पाळेकर, सरपंच व सर्व खात्यांच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

विजयदुर्ग विभागामध्ये भुमिगत विदयुत वाहिन्यांचे काम करतेवेळी नळपाणी योजनेचे पाईप तुटने, बीएसएनएलच्या भुमिगत वाहिन्या तुटल्यामुळे विजयदुर्ग,तिर्लोट,वाडा या गावांमध्ये गैरसोय निर्माण झाल्याच्या समस्या उपस्थितांनी मांडल्या. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सदर भुमिगत वाहिन्यांचे काम करीत असतेवेळी ठेकेदाराने पाण्याच्या पाईप लाईनला बीएसएनएलच्या वाहिन्याचे नुकसान न होता तसेच रस्ते खडडेमय होता कामा नये याची काळजी घेवून कामे करण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी या आढावा सभेच्यावेळी ठेकेदार व अधिकारी वर्गांना दिले आहेत.

पडेल-तिर्लोट रस्त्यावरती भुमिगत विदयुत वाहिन्यांचे काम चालु असल्यामुळे रस्त्यांवरती खडडे पडल्याने एसटी वाहतुक गेली काहि दिवस बंद झाल्याची तक्रार पडेल सरपंच भुषण पोकळे यांनी उपस्थित केली. सदर रस्त्याचे काम करुन एसटी वाहतुक सुरळीत करण्याचे आदेश यावेळी संबंधित खात्याला देण्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. यावेळी तिर्लोट, पोंभुर्ले, पुरळ, विजयदुर्ग, वाडा व अन्य गावातील सरपंचांनी नळपाणी योजना, विदयुत वितरण कंपनीच्या माध्यमातून भुमिगत विदयुत वाहिन्यांचे काम करतेवेळी नळपाणी योजना व इंटरनेट सेवेची ओएफसी केबल तुटल्यामुळे झालेल्या गैरसोयींच्या समस्या पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे उपस्थित केल्यावरती पालकमंत्री राणे यांनी तात्काळ त्या प्रश्नांचे निरसन करुन उपस्थित त्या त्या खात्याच्या अधिकारी वर्गांना विकास कामे करतेवेळी कोणतीही जनतेची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावे असे आदेश देवून संबंधित अधिकारी वर्गाने उपस्थित केलेल्या सरपंच व ग्रामस्थांच्या समस्यांचे येत्या दोन दिवसांत समस्या सोडविल्या जातील असे सांगितले. यावेळी उपस्थित सरपंच व जनतेमधून पालकमंत्री नितेश राणे यांनी पडेल येथे बैठक घेवून विजयदुर्ग दशक्रोशीतील विकास कामांबददल आढावा बैठक् घेवून आपल्या प्रश्नांचे निरसन केल्याबददल पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. जनतेच्या मनातील विकासाचा महामेरु आणि सर्व सामान्यांचा पालकमंत्री असल्याचे जनतेमधून गौरोदगार काढले जाते होते. भाजपा पडेल मंडळ अध्यक्ष बंडया नारकर यांनी आढावा बैठकीचे पडेल येथे आयोजन केल्या बदल्ल उपस्थित सरपंच व ग्रामस्थांमधून त्यांचे कौतूक करण्यात आले. तसेच त्यांच्या कामाच्या कार्यपध्दतीवरती देखील उपस्थित जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात आले. सर्व सामान्य मानसांचा कार्यकर्ता म्हणून नारकर यांची ओळख आहे.