चौकुळ शाळेत जर्मनी भाषेचे धडे

Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2024 19:42 PM
views 404  views

सावंतवाडी : अतिदुर्गम अशा जिल्हा परिषद शाळा चौकुळ येथील गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना जर्मनी भाषेचे धडे दिले आहेत. राज्य शासन अन् जर्मनी यांच्यात झालेल्या करारानंतर राज्यात जर्मनी भाषा प्रशिक्षण दिले जाते आहे. यात जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याच काम केलं गेलं आहे. आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत हे प्रयोगशील शिक्षण दिलं गेलं आहे.


सावंतवाडीतील दऱ्याखोऱ्यात वसलेलं निसर्ग संपन्न गाव चौकूळ. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 ही मराठी शाळा आहे. शाळाही तशी दुर्गमच आहे. शाळेत विद्यार्थीही बोटावर मोजण्या इतपत. वाडीत जेमतेम वीस ते तीस घरे असून शाळेत कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही. परंतु, हेच गाव देशाचं रक्षण करणारे सैनिक जन्माला घालत. येथील मुलंही हुशार, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हीच शिक्षणाची व्याख्या आहे.  या अनुषंगाने या शाळेत हजर झालेले शिक्षक तांबोळी हे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी लागावी त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विविध कौशल्य आत्मसात करावीत या हेतूने आनंददायी शनिवारी वेगवेगळे उपक्रम घेत असतात. या शनिवारी त्यांनी मुलांना चक्क जर्मन भाषेचे धडे दिले. जर्मन भाषेची ओळख एक ते 10 अंक आणि अल्फाबेट्स जर्मनीतून शिकवले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी हे लगेच आत्मसात देखील केलं.


दरम्यान, मातृभाषेबरोबर इंग्रजी जशी महत्वाची तशी जर्मण भाषेचं सुद्धा महत्व असल्याच तांबोळी यांनी सांगितलं.  एका बाजूला मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत असताना दुसऱ्या बाजूला या शाळा टीकाव्यात म्हणून जिल्हा परिषदेतील असे अनेक शिक्षक प्रयत्न करतायत ही बाब कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र शासनाकडून अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन माय मराठीसह मराठी शाळा जपत काळानुसार विकसित होणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांना प्रोत्साहन देण तेवढंच गरजेच आहे.