
सावंतवाडी : विविध पक्षांच्या यात्रा निघत आहेत. मात्र, आमचा संकल्प आहे. जनतेच्या हृदयात आम्हाला स्थान निर्माण करायचं आहे असं विधान उबाठा शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख रूपेश राऊळ यांनी केल. तर मल्टीस्पेशालिटी रखडवण्याचं काम दीपक केसरकर यांनी केल असून येणाऱ्या विधानसभेत तुमचे प्रश्न सोडवणारा आमदार निवडून द्या असं आवाहन त्यांनी केले. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना संपर्क अभियानचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी श्री. राऊळ बोलत होते.
ते म्हणाले, सावंतवाडी विधानसभेची अभियान यात्रा भगव्या सप्ताहा निमीत्ताने सुरू होत आहे. प्रत्येक गावात हा भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावत घेऊन जाताना जनतेची सेवा आम्ही करणार आहोत. जनतेच्या हृदयात स्थान मिळविण्यासाठी हे अभियान आहे. काम केलं तरच जनतेचे आशीर्वाद मिळतात. मला मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेसाठी व्हावा यासाठी हे अभियान आहे. विविध पक्षांच्या यात्रा निघत आहेत. मात्र, आमचा हा संकल्प आहे. येणाऱ्या काळात लोकसेवक हा शब्द पाळणारा असावा, यासाठी योग्य
लोकप्रतिनिधी निवडून द्या. आरोग्याचा प्रश्न इथं मोठा आहे. सरकारी रूग्णालयांत आपण जातो. आज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल झालं असतं तर फायदा झाला असता. मात्र, ते रखडवण्याच काम दीपक केसरकर यांनी केलं. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत तुमचे प्रश्न सोडवणारा आमदार निवडून द्या असं आवाहन रूपेश राऊळ यांनी केलं.
कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना काजू कलमांच वाटप करण्यात आले. उपस्थित नेतेमंडळींनी मार्गदर्शन करताना येणाऱ्या विधानसभेत परिवर्तन घडविण्याचा निर्धार केला. याप्रसंगी उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, सौ. सुकन्या नरसुले, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, मायकल डिसोझा, शिवदत्त घोगळे, प्रकाश गडेकर, अशोक परब, अँड. कौस्तुभ गावडे, बाळू गवस, नामदेव नाईक आदी शिवसैनिक उपस्थित होते.