
सावंतवाडी : आंबोली मौजे गेळे काबुलातदार गावकर जमीन विषयी गेळे गावची बैठक झाली. या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी एक मताने ठराव घेतला. गेळे काबुलातदार जमीन विषयी गावची भूमिका मांडण्यासाठी गाव म्हणून संदीप एकनाथ गावडे, सागर प्रकाश ढोकरे व आनंद वसंत गावडे हेच तीन व्यक्ती गावच्यावतीने प्रशासन, शासन किंवा कोणतेही इतर अधिकारी कोणही असुदे फक्त हेच गेळे गावच्यावतीने भूमिका मांडतील. गेळे गावाने एकमताने हा ठराव करून दिला आहे. तर जर कोणाला याविषयी काही विचार किंवा विषय मांडायचा असेल तर गावात कोणालाही भेटून संवाद साधून काही साध्य होणार नाही. केवळ नेमणूक करून दिलेल्या व्यक्तीशी संपर्क करावा अस आवाहन गेळे ग्रामस्थांनी केल आहे.