'सुगम संगीत' गायन स्पर्धेत मणेरीचा गीतेश गणू कांबळे प्रथम

माणगावची पल्लवी पिळणकर द्वितीय तर तळेबाजार - देवगड येथील शौरीन देसाई तृतीय
Edited by:
Published on: March 18, 2024 14:15 PM
views 87  views

दोडामार्ग : सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्गच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादीत आयोजित हिंदुस्थानी खुली "सुगम संगीत गायन स्पर्धेत" मणेरी-दोडामार्ग दोडामार्ग येथील गीतेश गणू कांबळे याने  प्रथम, माणगाव - कुडाळ येथील  पल्लवी संजय पिळणकर द्वितीय व तर  तळेबाजार-देवगड येथील  कु.शौरीन संजीव देसाई याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दोडामार्ग तालुक्यात प्रथमच सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग च्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादीत हिंदुस्थानी खुली "सुगम संगीत" गायन स्पर्धा २०२४ चे आयोजन केले होते. रविवारी श्री. विश्वकर्मा मंदिर झरेबांबर याठीकाणी ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत गोवा राज्य, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग या भागातील ७० हुन अधिक स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी पारितोषिक रोख रक्कम रु. ५ हजार, ३ हजार व २ हजार ठेवण्यात आली होती. संतोष पांडुरंग भिसे, संजय  गवस व अजित  देसाई यानिबतर उत्तेजनार्थ दोन पारितोषिक,  महादेव तुकाराम सुतार, अमित गाड यांनी पुरस्कृत केली होती. सन्मानचिन्ह सौ. ज्योति रमाकांत जाधव यांनी पुरस्कृत केली होती.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे* : प्रथम विजेता गीतेश गणू कांबळे मणेरी दोडामार्ग, द्वितीय विजेता पल्लवी संजय पिळणकर माणगाव कुडाळ, तृतीय विजेता शौरीन संजीव देसाई तळेबाजार, देवगड, उत्तेजनार्थ आसावरी मेघनील वाटवे पावशी कुडाळ, प्रशांत काजरेकर तळवडे सावंतवाडी, वासुदेव सखाराम देसाई डेगवे सावंतवाडी तर प्रोत्साहनार्थ खुश कृष्णनाथ पेडणेकर थिवी गोवा. 

या विजेत्या स्पर्धाकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आल. अन्य सहभागी स्पर्धाकांना सहभाग प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी परीक्षक सुदन पडते, प्रीती कर्पे, नामदेव घोटगेकर, अर्जुन उर्फ बबन आरोंदेकर,गणू कांबळे सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोक कला मंच दोडामार्ग अध्यक्ष शंकर मधुकर जाधव, उपाध्यक्ष महादेव सुतार, सचिव सागर नाईक, सहसचिव विलास आईर, खजिनदार महेश पारधी, कार्याध्यक्ष संजय गवस, सल्लागार प्रकाश वर्णेकर, संजय सुतार, प्रचार प्रसिद्धी प्रमुख देविदास सुतार, सदस्य भगवान नाईक, अशोक गवस आदी उपस्थित होते. स्पर्धेला परीक्षक म्हणून परीक्षक  सुदन पडते माशेल गोवा प्रीती कर्पे साखळी तर सात संगत तबला वादन अर्जुन उर्फ बबन आरोंदेकर खुटवळ गोवा, हार्मोनियम गणू कांबळे मणेरी दोडामार्ग यांनी केली. यावेळी परीक्षक म्हणून परीक्षक सुदन पडते, प्रीती कर्पे यांनी मार्गदर्शन केले.  अध्यक्ष शंकर जाधव यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.