
कणकवली : कणकवलीमध्ये सुपर ग्राहक मॉलला उद्घाटन प्रसंगी गौतमी पाटील, जानवी किल्लेकर ओम यादव यांना पाहण्यासाठी सायंकाळी होम मिनिस्टर या कार्यक्रमात महिलांनी मोठी गर्दी केली.
यावेळी गौतमीने महिलांसोबत नाचताना देखील विविध गाण्यांवर ठेका धरला. ओम यादव यांनी आपल्या हास्य विनोदाने नवरा बायकोच्या खेळ पैठणी कार्यक्रमात सगळ्यांना खळखळून हसवले आणि जान्हवी किल्लेकर हिने सर्वच युवती व महिला वर्गाला आपल्या अदाकारीने घायाळ केले व महिलांसोबत गाण्याचा ठेका धरला यावेळी महिलांची लक्षणे उपस्थिती पाहायला मिळाली. सुपर ग्राहक मॉलला कणकवलीकरांचा प्रतिसाद एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्याबद्दल रणजित शिंदेंही भारावून गेले












