याला जबाबदार कोण ? ; रस्ता खचल्याने गौरी पार्सेकर संतापल्या

Edited by: संदीप देसाई
Published on: July 29, 2023 20:50 PM
views 122  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरात एम एन जी एल कंपनीने गॅस पाईपलाईन साठी खोदकाम केलेले ठिकाणी व्यवस्थित मजबुती करणं न करता त्यावर डांबरीकरण केल्याने शहरातील बहुतांश रस्ता साईडपट्टी खचल्याने शहरात वाहतूक करतांना नागरीकांना सातत्याने अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नगरपंचायतच्या याच प्रभागाच्या नगरसेविका तथा शिक्षण सभापती सौ. गौरी पार्सेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. येत्या चार दिवसात आता खचलेल्या आणि संभाव्य ठिकाणी बांधकाम खात्याने डागडुजी करून शहरवासीय व बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.

  दोडामार्ग सावंतवाडी मार्गावर पिंपळेश्वर चौक ते जिल्हा बँक शाखे दरम्यान एका बाजूनं ही साईडपट्टी काही ठिकाणी एक ते दीड फूट खचली आहे. पावसाच्या सुरवातीपासूनच शहरात अशी अवस्था असून बांधकाम खात त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मुळात शहर, तालुक्याची बाजारपेठ, प्रशासकीय मुख्यालय, शिक्षण यामुळे संपूर्ण तालुक्यांतून नागरिक याठिकाणी ये जा करत असतात. असे असतानाही बांधकाम विभाग सदर वाहतूक व रहदारीस धोकादायक झालेली साईडपट्टी, मुख्य खचलेल्या रस्ता ठिकाणी उपाययोजना करण्यास बेफिकीरी करत असल्याने शहर वासियात नाराजी आहे. आता याप्रश्नी सभापती सौ. पार्सेकर आक्रमक झाल्या असून येत्या चार दिवसात शहर बाजारपेठेत खचलेल्या ठिकाणी संपूर्ण रस्त्याची डागडुजी न झाल्यास याचा सार्वजनिक बांधकाम खात्याला जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.

   शहरातील जिल्हा बँक एटीएम समोर तर गॅस पाईपलाइन काम रस्ता डांबरीकरण झाले नंतर करणेत आल. याच ठिकाणी गोवा दोडामार्ग खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बस थांबत होत्या. मात्र याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्याने या बस पुढे पार्किंग केल्या जातात परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय खचलेल्या आणि कधीही अवजड वाहने व दुचाकी पाईपलाईन खोदकाम केलेल्या भागात रुतले जात असल्याने वारंवार अपघात होत आहेत. परवाच एक वाळू वाहतूक करणारा डंपर शहरात असाच रुतल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. तर दुचाकी गाड्या या चरात जात असल्याने अपघात घडतं आहेत. यामुळे तत्काळ या ठिकाणी बांधकाम विभागाने लहान दगड व वर क्रशर वरील पूड टाकून शहारातील हा रस्ता धोकामुक्त करण्याची मागणी सौ. पार्सेकर यांनी केली आहे.