पक्ष संघटना वाढीसाठी लवकरच जिल्ह्यात मेळावा : रामदास आठवले

Edited by: साहिल बागवे
Published on: September 01, 2024 14:18 PM
views 252  views

कणकवली : रिपाई पक्ष वाढविण्यासाठी मराठा समाज, कुणबी समाज त्याचप्रमाणे अन्य बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या घटकांना एकत्र घेऊन संघटनेचा विस्तार करावा लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी लवकरच मेळावा घेण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सहभाग मिळावा ही आमची मागणी असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी सांगितले. 

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बांधकामात भ्रष्टाचार झाला असे म्हणणाऱ्या विरोधकांना माझा सवाल आहे. छत्रपती शिवरायांसारख्या महामानवाच्या पुतळ्याच्या कोणी भ्रष्टाचार करू शकतो का याचा विचार आरोप करणाऱ्यानीच करावा. या विषयात राजकारण करू नका. जोडे मारो सारखे आंदोलन चुकीचे असून चौकशी समितीचा अहवाल आल्यावर जबाबदार ठरलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे असे सांगताना रिपाई पक्षाला लोकसभेच्या दोन जागा महायुतीच्या नेत्यांनी दिल्या असत्या तर आमच्या मागणी प्रमाणे शिर्डी आणि नगर या जागांचे निकाल वेगळे लागले असते. मात्र महायुतीच्या नेत्यांनी रिपाई कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला.  कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी राजकोट येथील पुतळा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासमवेत रिपाई जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.


ना. आठवले म्हणाले, मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे हा देशतील पहिलाच प्रकार असावा. अमेरिकेत तीन समुद्रांमध्ये असलेल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी हा पुतळा शेकडो वर्षे उभा आहे. मोठे वादळ होतात तेव्हा एखादी घटना घडते मात्र पुतळा कोसळण्याची घटना पहिलीच आहे. पुतळा कोसळण्याऐवधी हवा मुळात नव्हतीच. पुतळा योग्य पद्धतीने उभारला गेला नसल्याने आणि नवीन कलाकाराने अनुभवाशिवाय बनविला असल्याने तो कोसळला असावा. छत्रपती शिवाजी म