
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सर्वात मोठे रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसी मधील अपघातांचे सत्र कमी होताना दिसत नाही. गेल्या महिनाभरात येथे वेगवेगळ्या कंपन्यामध्ये अपघात झाले असून कामगारांसह स्थानिकांचे जीव धोक्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वी येथील पुष्कर पेट्रोल प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. तर काही दिवसांपूर्वी येथील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती होऊन स्थानिकांना स्वशानाचा त्रास झाला होता.
त्यानंतर आज शुक्रवारी येथील योजना कंपनीतून वायू गळती झाली आहे. या वायुगळतींमुळे तलारी वाडीतील नागरिकांना त्रास होऊ लागल असून या परिसरात वायू गळतीमुळे धुके संमिश्र वातावरण तयार झाले आहे. योजना कंपनीची इंटरमीडिएट पाईपलाईन फाटून ओलियमची वायू गळती झाली असून येथील नागरिकांचा सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.