जबरदस्त मंडळाने पहिल्याच वर्षी घेतलेली गरुडझेप आदर्शवत-मनिष दळवी

जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, राऊळवाडा वेंगुर्लाचा "गरुडझेप महोत्सव २०२३" उत्साहात संपन्न
Edited by: दिपेश परब
Published on: January 16, 2023 20:02 PM
views 148  views

वेंगुर्ले: वेंगुर्लेत जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम राबवित असलेल्या जबरदस्त कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळाने पहिल्याच वर्षी सेवाभावी उपक्रम राबवून घेतलेली गरुडझेप ही आदर्शवत आहे. असेच सेवाभावी, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विविध स्पर्धा, व सामाजिक उपक्रम मंडळाने सातत्याने राबवावेत. अशा कार्यक्रमांसाठी आपण सहकार्य करीन. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी जबरदस्त मंडळाच्या बक्षिस वितरण प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना केले.

  वेंगुर्ले राऊळवाडा येथील जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने गरुडझेप महोत्सव २०२३' अंतर्गत आयोजित केलेला चित्रकला, रंगभरण, रस्सीखेच स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ राऊळवाडा येथे संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरात अध्यक्षस्थानी मनिष दळवी, शिवसेनचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ, वायंगणी सरपंच सुमन कामत, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, देवस्थानचे मानकरी रवींद्र परब, उभादांडा उपसरपंच टिना आल्मेडा, भाऊ मालवणकर, विरेंद्र कामत-आडारकर, वृंदा गवंडळकर, कार्मीस आल्मेडा, संजय गावडे, खर्डेकर महाविद्यालयाचे संजय पाटील, नामदेव सरमळकर, पिंटू कुडपकर, आनंद रेडकर, विलास कुबल आदींचा समावेश होता.

   मंडळाने आयोजित केलेल्या रंगभरण स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे - 

पहिली ते दुसऱी गट-

 प्रथम- रुजल सातोसे (कुडाळ), द्वितीय- आराध्या राऊळ (वेंगुर्ला), तृतीय- सानवी सातार्डेकर (वेंगुर्ला), चित्रकला स्पर्धा- तिसरी ते चौथी गट-प्रथम- मनस्वी खानोलकर (वेंगुर्ले शाळा नं. १),  द्वितीय- हर्षांक टेमकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन वेंगुर्ले), तृतीय- कौस्तुभ परब (वेंगुर्ले शाळा नं. १), 

पाचवी ते सातवी गट- प्रथम- प्रिया देसाई (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी), द्वितीय- सर्वेश मेस्त्री (वेंगुर्ले शाळा नं. ३), तृतीय चिन्मय किनळेकर (वेंगुर्ले शाळा नं. ४), आठवी ते दहावी गट- प्रथम- दीक्षा  पालकर (अणसुर-पाल हायस्कूल), द्वितीय- विष्णू आरोलकर (दाभोली इंग्लिश स्कूल), तृतीय- विभागून रामचंद्र मालवणकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन, वेंगुर्ले) व गुंजन कुडपकर (एम. आर. देसाई स्कूल), रस्सीखेच स्पर्धेतील विजेता संघ क्षेत्रपालेश्वर होडावडा तर उपविजेता संघ- सिध्देश्वर दाळकर, बेस्ट फ्रंट मेन- दिपक पार्सेकर (क्षेत्रपालेश्वर होडावडा संघ), बेस्ट लास्ट मेन- दादा परब (सिध्देश्वर टाळकर अ' संघ) आदींना व्यासपिठारील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली.

  या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे पंच म्हणून निवड झालेले जयेश परब, राष्ट्रीय नेमबाज म्हणून निवड झालेली कु. सानिया आंगचेकर, कर्णबधीर असूनहि उत्कृष्ट चित्रकार असलेली पूजा धुरी, कै. बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कौलगेकर, आरवली सोन्सुरे येथील प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार चंद्रकांत मेस्त्री या मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.

 सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ राऊळवाडाचे अध्यक्ष संभाजी राऊळ, तसेच मंडळाचे कार्यकर्ते मंगेश परब, सिध्देश रेडकर, विजय आंदुर्लेकर, अनंत रेडकर, कौशल मुळे, स्वाती पाटकर, प्रांजल वेंगुर्लेकर, सागर शिरसाट, बबन आंदुर्लेकर शिवाजी राऊळ, चिंटू राऊळ, संजय भाटकर, यशवंत किनळेकर, शेफाली खांबकर, मनाली रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, विवेक राऊळ, नाथा बोवलेकर, निल नांदोडकर यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले.