न.पं. परिसरातील कचरा उचलण्यास सुरुवात

नितेश राणेंचा पुढाकार
Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 17, 2024 09:13 AM
views 114  views

देवगड : देवगडमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा कचरा न.पं.परिसरात डंपींग करण्यात आला. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होवून आरोग्यास धोका निर्माण झाला. यामुळे पंधरा दिवसापुर्वी भाजपाने आंदोलन छेडले त्यानंतर काही कचरा उचलण्यात आला. मात्र शिल्लक राहीलेला कचरा व पडलेला पाऊस यामुळे दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा उचलण्यासाठी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांनी पुढाकार घेतला असून रविवारपासून कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील नागरिकांचे तसेच नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी हे पाऊल आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचा सुचना त्यांनी ओमटेक असोशिएट यांना दिल्या आहेत. त्यांचा सहकार्यातुन न.पं.परिसरातील कचरा उचलुन स्वच्छ करणार असल्याचे चांदोस्कर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. तोपर्यंत तात्पुरती कचरा डंपींग करण्यासाठी आपण स्वत:ची जागा मोफत देणार असल्याचे सांगितले. संपूर्ण कचरा उचलण्यास सुमारे दोन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.