
सावंतवाडी : मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच 'गाव चलो अभियान' हा उपक्रम सुरू केला असून सर्वसामान्य लोकांना योजनेचा लाभ मिळतो की नाही ? त्या समस्या जाणून घेण्यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केला असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
लोकांपर्यंत मोदींच्या योजना पोहोचवण्यासाठीच हा उपक्रम सुरू केला आहे. सावंतवाडीत गाव चलो अभियान कार्यक्रमानिमित्त येथील बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांना मोदी सरकारच्या योजनेच्या पत्रकांचे वितरण बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांना करण्यात आले.
यावेळी सावंत पुढे बोलतान म्हणाले, की गाव चलो अभियान हे प्रत्येक गावात जाऊन लोकांची संवाद साधून लोकांना योजनेबाबत लाभ मिळतो की नाही याची खातरजमा करून त्यांच्या समस्या दूर करायचा यासाठीच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्याला मोदी सरकारच्या योजनेचा लाभ सर्वात जास्त झाला असून अनेक काही लोकांना तांत्रिक अडचणीमुळे त्याचा लाभ घेता आला नसून ते सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात दूर करून त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ करून देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, रणजीत देसाई, रविंद्र मडगावकर, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, प्राजक्ता केळुसकर, आनंद नेवगी, विनोद सावंत आदी उपस्थित होते