
सावंतवाडी : येथील जिमखाना मैदानावर उद्या शनिवारी दुपारी तीन वाजता आठवणीतले खेळ हा अस्सल भारतीय पारंपरिक खेळाचा अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे.
विटीदांडू, लगोरी, आट्या-पाट्या, हुतूतू, रस्सीखेच, गोट्या असे विविध क्रिडा प्रकार जिमखाना मैदानावर अभिनव फाऊंडेशन व सावंतवाडी नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहेत. क्रिडा प्रकार संचलनात तांत्रिक सहयोगी म्हणून माझा वेंगुर्ला टिम आणि तीचे मेंटाँर हे खास आकर्षण राहिल. तर सावंतवाडी संस्थान मधील प्रसिध्द गंजिफा या खेळाविषयी संस्थानमधील कलाकार माहिती देणार आहेत. गंजिफा हा कला व क्रिडा प्रकार फक्त सावंतवाडी संस्थानमध्येच आहे. या गंजिफा कशा खेळाव्यात याची माहिती दिली जाणार आहे.
आठवणीतल्या या खेळांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्त्री, पुरुष सहभागी होऊ शकतील. त्या करीता कोणतेही प्रवेश शुल्क नसून अगदी मनमोकळेपणाने कोणीही सहभागी होऊ शकेल. महिलांचे स्वयंसहाय्यता समूह, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, तरुण तरूणी, विविध संस्था, मंडळाचे सहकारी, क्रिडा प्रेमी यांनी सहभागी होण्याचे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी नितीन साळुंखे, अभिनव फाऊंडेशनचे संस्थापक ओंकार तुळसुलकर यांनी केले. अभिनव आठवणीतले खेळ शनिवारी 18 नोव्हेंबर ला आणि रविवारी 19 नोव्हेंबर ला दुपारी तीन ते सहा या वेळेत आणि रविवारी या वेळेत आयोजित केले आहेत. तरी जास्तीत-जास्त क्रिडा रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद आणि अभिनव फाऊंडेशन यांनी केले आहे.