कलमठ मधून गांजा पुरवठादारास अटक..!

Edited by:
Published on: November 02, 2023 10:44 AM
views 380  views

कणकवली :  तालुक्यात गांजा विक्री रॅकेटचा बुरखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे कडून उघड केल्यानंतर आता आज बुधवारी कलमठ मध्ये एका गांजा पुरवठा करणाऱ्या संशयित आरोपीकडून 40 ग्रॅम गांजा ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आली आहे.

त्यामुळे कणकवली तालुक्यातील गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून 1 किलो 10 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार गांजा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारास कलमठ येथून पोलिसांनी आज अटक केली. त्याच्याकडे  40 ग्रॅम गांजा  आढळला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे कडून देण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, हवालदार राजु जामसांडेकर, प्रकाश कदम, किरण देसाई, महिला पोलीस रूपाली खानोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.