
कणकवली : कणकवली तालुक्यातील एका माळरानावर 21 वर्षीय युवतीवर दारू पाजून दोन ते तीन जणांकडून रेप झाल्याची घटना घडली असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना 15 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पहाटे च्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी बाळकृष्ण सदानंद तांबे(२६,नाद देवगड),शैलेश शांताराम तांबे( दारुम),गणेश प्रकाश गुरव(शिरवली ता.देवगड) या तिघांवर सामूहिक बलात्कार व अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी के.एल.सावंत व कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत