नवसाला पावणाऱ्या गांगो अनभवानी मातेचा 13 डिसेंबरला जत्रोत्सव !

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 07, 2023 16:02 PM
views 271  views

कणकवली : पाच शेर पाणी जाळणारी आणि भक्तांच्या हाकेला व नवसाला धावून जाणारी डांमरे गावची ग्रामदेवता श्री देव गांगो अनभवानी माता हिचा वार्षिक जत्रोत्सव 13 डिसेंबर 2023 रोजी होत असून या यात्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन गावाच्या वतीने करण्यात आले आहे

शिर्डी चे साईबाबा नंतर महाराष्ट्रात पाण्यावर दिवा या यात्रे दिवशी पेटवला जातो पाचशेर पाणी कोव्हाळ्यात मानकरी ओततात तर नंतर ते पाणी दीपस्तंबावर ठेवलं जातं देवाची सवारी निघते पाच फेऱ्या नंतर देवाची यात्रा संपन्नतेकडे जात असताना दशावतारी नाट्य प्रयोग देखील ठेवला जातो दुसऱ्या दिवशी अनभवानी उगम स्थानाकडे देवीचे सर्व तरंग घेऊन बारापाचाचे मानकरी गाव व रयतेला घेऊन कानडे वाडी येथील ब्राह्मण देवस्थान येथे जात असतात संपूर्ण गाव फेरी पूर्ण झाल्यावर देवाचे तरंग अनभवानी मातेच्या मंदिरात आणले जातात अशा रीतीने यात्रा संपन्न होत असते.