
दोडामार्ग : दोडामार्ग सावंतवाडा शाळेत दोन शिक्षक कार्यरत असून पहिली ते चौथी पर्यंत दोन शिक्षक व पुढे पाचवीत एक मुल असेल तरी आणखीन एक शिक्षक दिला जातो. आज जवळपास तालुका आणि जिल्ह्यात अनेक रिक्त शाळामध्ये शिक्षक भरतीत शिक्षक दिलेले आहेत. या शाळेतही नियमानुसार दोन शिक्षक दिलेत व येथील विध्यार्थी संख्या पहाता अजून एक शिक्षक स्वयंसेवक डिएड भरतीवेळी प्राधान्याने दिला जाईल. तेथील पालकांकडून झालेल्या मागणीनुसार निंबाळकर गुरुजी ज्याची नियमानुसार बदली झाली त्यानाही परत सदर शाळेवर कामगिरीवर पाठवून शाळा व्यवस्थापन केलं आहे. आमचे नेते व शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही सोय करण्यात आली. अन्य शाळाच्या तुलनेत या १ ते ४ च्या शाळेत मुलांची संख्या ५० हुन अधिक आहे. त्यामुळे तीसरा शिक्षकही स्वयंसेवक दिला जाईल, त्यामुळे पालकांनीच प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केली आहे.